रवा वडा बनवा घरच्या घरी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेदूवडा हा पारंपारीक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. मेदूवडा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. मेदूवडा बनवण्यासाठी उडीदाच्या डाळीचा उपयोग केला जातो. (Instant Suji Medu Vada Recipe) पण रव्याचे मेदू वडे बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही यात पद्धती तुम्हाला डाळ भिजवण्याचीही आवश्यकता नाही. स्वादीष्ट मेदूवडे चविला उत्तम आणि करायलाही तितकेच सोपे असतात. रव्याचे वडे हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट दिसतात Make Rava Vada at home
रव्याचा मेदूवडा बनवण्याचे साहित्य
रवा -१ कप
दही – ३ कप
किसलेलं आलं – १ टिस्पून
बारीक चिरलेली हिरवी मिरची- १ टिस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर -२ टेबलस्पून
बेकींग सोडा – १/४ टिस्पून
लाल मिरची पावडर- १/४ टिस्पून
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ
१) सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी रव्याचा वडा उत्तम पर्याय आहे. ही डिश बनवणयासाठी सगळ्यात आधी एक मोठा बाऊल घ्या त्यात रवा आणि दही घालून दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करा.
२) यात बारीक केलेलं आलं, मिरची, चवीनुसार मीठ, लाल मिरची घालून व्यवस्थित मिसळून झाकून ठेवून द्या. त्यानंतर थोडं पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा.
३) रव्याचं बॅटर, उडीदाच्या डाळीपासून तयार झालेल्या बॅटर इतकंच घट्ट असावं. १५ मिनिटांसाठी रवा झाकून ठेवून द्या. जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल. रव्याचं बॅटर फुलल्यानंतर त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची, बेकींग सोडा घालून एकत्र करा. बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर त्यात थोडं पाणी घालून एकत्र करा.
४) एका कढईत तेल गरम करा, तेल चांगलं गरम झाल्यानंतर हातावर थोडं मिश्रण घेऊन गोल आकार देऊन मधोमध एक छेद करा. तेल गरम झाल्यानंतर कढईच्या कडेने वडे एक एक करून सोडा. वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करा. त्यानंतर हे वडे प्लेट मध्ये काढून घ्या. तयार आहे गरमागरम क्रिस्पी रव्याचा मेंदूवडा. हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी, सॉस किंवा सांबारबरोबर खाऊ शकता.
PGB/ML/PGB
16 Sep 2024