पौष्टिक पोहे बनवा झटपट

 पौष्टिक पोहे बनवा झटपट

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोहे हा अतिशय सोपा आणि झटपट घरगुती नाश्ता आहे. सहज पचण्याजोगे, हलके आणि चवदार असणे हे त्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात पोहे बनवले जातात.

१ वाटी पोहे, १ वाटी भिजवलेली हरबरा डाळ, २ वाट्या मक्याचे दाणे, अर्धी वाटी भरड दाण्याचा कुट (दाणे स्वच्छ सोलुन घ्यावेत), अर्धा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन, अर्ध्या लिंबाचा रस, कडीलिंबाची ४-५ पाने, ४ हिरव्या मिरच्यांचे एक सेंमीचे तुकडे, फोडणीसाठी मोहोरी, हळद, हिंग, १ डाव तेल.

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे व हरबरा डाळ मिक्सरमधे वाटुन घ्यावी. पोहे भिजवुन घ्यावेत. मग पोह्याला करतो तशी हिंग-हळद-मोहोरी-कडीलिंब-हिरवी मिरची फोडणी करुन त्यात दाणे व कांदा परतुन घ्यावा. पोहे, डाळ व मका सर्व एकदमच घालावे व चांगले हलवुन घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण घालुन चांगली वाफ येऊ द्यावी. लिंबाचा रस घालुन परत एकदा चांगले हलवुन घ्यावे. हे झाले पोहे तयार. वरुन सढळ हाताने नारळ व कोथींबीर पेरावी.

Make nutritious poha instantly

ML/ML/PGB 7 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *