मूगडाळ कचोरी बनवा घराच्या घरी

 मूगडाळ कचोरी बनवा घराच्या घरी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वप्रथम मुगडाळ २ तास पाण्यात भिजवून घ्या. भिजवतानाच आधी डाळ नीट धुवून साफ करून घ्या, आणि मगच भिजवा. २ तास झाल्यानंतर डाळ नीट निथळून घ्या, सर्व पाणी काढून घ्या, आणि मिक्सरवर फक्त आठ सेकंद फिरवा. डाळ अर्धवट तुटलेली अशी पेस्ट असायला हवी. Make halwai-like crispy, crispy moong dal kachori at home
जिरे, बडीशेप, काळी मिरी, कसुरी मेथी, धने हे सर्व खलबत्यात कुटून घ्या. हे सर्व एकत्र न करता वेगवेगळ कुटायचं आहे, याने या सर्वांची चव अबाधित राहते.
एका पॅनमध्ये तेल अतिशय मंद आचेवर तापवून घ्या. तेल गरम झाल्याबरोबर जिरे, बडीशेप आणि धने टाकून नीट १ मिनिटापर्यंत परतवा. त्यानंतर आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून अजून एक मिनिटं परतवून घ्या. यानंतर बेसन पीठ टाकून तपकिरी रंग येईपर्यंत परतवत राहा.
यानंतर उरलेले सर्व जिन्नस जसे की गरम मसाला, काळे मीठ, काळी मिरी, मीठ, तिखट आणि आमचूर पावडर घालून मिनिटभर नीट परतवा, व त्यानंतर शेवटी मुगडाळ मिश्रणात घालून चांगल्यारित्या मिक्स करून गॅस बंद करून बाजूला काढून घ्या. आता हे मिश्रण थोड्यावेळ थंड होऊ द्या.

पारी
एका मोठ्या परातीत २ कप मैदा घ्या. त्यात विरघळलेले कोमट तूप घाला, व अर्धा चमचा मीठ घाला. आता हे मिश्रण चांगल्यारित्या मिक्स करायला सुरुवात करा. या पिठाचे ठिसूळ गोळे झाले पाहिजेत. त्यानंतर थोडं थोडं गरम पाणी करून कणिक भिजवायला सुरुवात करा. कणिक चांगल्या रित्या मळली गेली पाहिजे. कणिक जास्त घट्ट भिजवली जायला नको, लवचिकच भिजवा.
कणकेतून एक छोटा गोळा तोडून बघा. तो गोळा तोडताना लवकर कणकेतून विलग होत नसेल, तर आपली कणिक चांगल्या रित्या भिजवली गेली आहे.
आता पूर्ण कणिक ओल्या फडक्यात २० मिनिटे गुंडाळून ठेवा.

सारण

सारणाचे समान आकाराचे छोटे गोल गोळे करून घ्या. (मी गुलाबजामच्या आकाराचे केले होते.) त्यानंतर जितके गोळे होतील, त्याच्या २/३ संख्येत कणकेचे गोळे करून घ्या. (म्हणजे सारणाचे १५ गोळे असतील, तर मैद्याचे १० गोळे असायला हवेत. १-२ कमी जास्त चालतील.)
आता तळहातावर कणकेचा एक गोळा घेऊन दुसऱ्या हाताने जोरात दाबा. याने त्याला चपटेपणा येईल. मग त्यात सारणाचा गोळा भरून सर्व बाजूनी गोल फिरवत पॅक करा (मोदकासारखं) व वरचा उरलेला गोळ्याचा भाग काढून टाका.
असे सर्व मैद्याचे गोळे संपतील, पण सारणाचे गोळे उरतील. तर आता काढून टाकलेल्या भागाचे गोळे बनवा, व त्यात सारण भरा.

तेल मस्त कडकडीत तापवून घ्या, व मध्यम आचेवर एक एक करून तळा. एक कचोरी पाच मिनिटं एका बाजूने व पाच मिनिटे दुसऱ्या बाजूने अशी तळा. दहा मिनिटात मस्त सोनेरी होऊन फुलते.

PGB/ML/PGB
4 Oct 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *