MAHADISCOM मध्ये मोठी भरती सुरू

 MAHADISCOM मध्ये मोठी भरती सुरू

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) नं 249 पदांवर भर्ती सुरु केली आहे. ITI झालेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. ही भर्ती इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओपीए सारख्या ट्रेड्समध्ये करत आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर जाऊन रजिस्टर करू शकता. उमेदवारांची कागदपत्रे 21 ते 23 जून 2025 दरम्यान तपासली जातील. अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षांचा असायला हवा. तर जास्तीत जास्त 27 वर्षांचा असावा. ज्यांना आरक्षण आहे त्यांना त्यानुसार वयाच्या मर्यादेत सूट देण्यात येईल.

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. लेखी परीक्षेची आवश्यकता नाही, परंतु शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

एकूण 249 पदांसाठी भरती
इलेक्ट्रिशियन – 110 पदे
वायरमॅन – 109 पदे
सीओपीए (COPA) – 30 पदे

आवश्यक कागदपत्रे
आयटीआयचं शिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि निवास प्रमाणपत्र.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *