पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 16 डिसेंबरपासून हे बदल तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या या बदललेल्या वेळापत्रकानुसार अंधेरी-विरार लोकल सकाळी 6.49 वाजता भाईंदरपर्यंत थांबेल. नालासोपारा लोकल भाईंदरहून धावेल. या दोन्ही लोकल 15 डब्यांच्या असणार असून चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत जलद गतीने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेनुसार लोकल ट्रेन क्रमांक 92019 अंधेरी-विरार (6:49)ही भाईंदरपर्यंत धावणार आहे. तर गाडी क्रमांक 90648 ही गाडी नालासोपारा येथून सुटण्याऐवजी दुपारी 4.24 वाजता भाईंदर स्थानकावरून सुटेल. ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30) ही लोकल 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबे धावणार आहे. तसेच ही ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल फास्ट ट्रकवर धावेल. हे बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहेत. मात्र हे बदल का करण्यात आले आहेत. याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
SL/ML/SL
17 Dec. 2024