भारत-वेस्ट इंडीज वनडे साठी भारतीय संघात मोठे बदल

 भारत-वेस्ट इंडीज वनडे साठी भारतीय संघात मोठे बदल

ब्रिजटाऊन, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

ब्रिजटाऊन : येथे उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना होत आहे. या सामन्यासाटी भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे आता समोर आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मालिकेत सर्व खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आता तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूंना संधी देणे ही बाब भारताने अलीकडे वनडे क्रिकेटमध्ये एक गोष्ट स्वीकारली आहे. भारतीय संघात चार अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इशान किशन आणि संजू सॅमसन यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्पर्धा करत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघात वेगवान गोलंदाजांच्या स्थानासाठीही चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत असल्याचे समोर आले आहे.
भारतीय Playing XI: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन/इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट/उमरान मलिक, मोहम्मद सिराज/ उमेश यादव.

या पहिल्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ सध्या फॉर्मात आला आहे. कारण दुसऱ्या कसोटीत त्यांनी भारताला चांगली लढत दिली होती. त्यामुळे आता ते वनडे मालिकेत कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण त्यापूर्वी कोणाला संघात स्थान मिळते, याची उत्सुकता सर्वांना असेल.

SL/KA/SL

26 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *