कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये मोठा बदल

 कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये मोठा बदल

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 ( EPS ) आता मोठा बदल होणार आहे. याआधी सहा महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना रक्कम मिळत नसे . मात्र आता नविन नियम बदलाने सहा महिन्यांहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. योजना आणखीन चांगली करण्यासाठी EPF नियमात सुधारणा करण्यात आली आहे. आता सदस्यांनी किती महिने सेवा केली यावर विड्रॉअल बेनिफीट मिळणार आहे. तसेच यानुसारच वेतनावर EPS योगदान दिले जाणार आहे. या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे. या नियम बदलण्याने 23 लाखांहून जास्त EPS सदस्यांना लाभ होणार आहे. सहा महिन्याच्यां आत नोकरी सोडल्याने किंवा अन्य कारणाने योजनेत हप्ते बंद झालेल्यांना देखील पैसे काढता येणार आहेत. दरवर्षी लाखो ईपीएस सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग दहा वर्षे हप्ते न भरताच ही योजना अर्धवट सोडतात.

आतापर्यंत विड्रॉअल बेनिफीटचे कॅलक्युलेन संपूर्ण वर्षांत अंशदायी सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केले जात होते, ज्यावर ईपीएस अंशदानचे वाटप केले जात होते. अंशदायी सेवा सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतरच सदस्यांना पैसे काढता येत होते. त्यामुळे सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. जुन्या नियमांमुळे सहा महिन्यांहून कमी अंशदान सेवा देण्याआधीच योजनेतून बाहेर पडत होते. आर्थिक वर्षे 2023-24 च्या दरम्यान अंशदान सेवा सहा महिन्यांहून कमी झाल्यामुळे पीएफचे पैसे काढण्याचे सात लाख दावे फेटाळण्यात आले होते. आता जे ईपीएस सदस्य जे 14.06.2024 पर्यंत 58 वर्षांचे झाले नाहीत, त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

SL/ML/SL

29 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *