2 बँका आणि 3 फायनान्स संस्थांवर RBI कडून मोठी कारवाई

 2 बँका आणि 3 फायनान्स संस्थांवर RBI कडून मोठी कारवाई

मुंबई. दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँकेने CSB बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधित बँका आणि फायनान्स कंपनांना लावण्यात आलेला दंड नियमांचे उल्लंघन आधारित आहेत.यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळू शकतील. याशिवाय ग्राहकांचे पैसे देखील सुरक्षित राहतील.

  • RBI ने CSB बँकेला वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील जोखीम तसेच व्यवस्थापनासंबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.86 कोटी रुपयांया दंड ठोठावला आहे.
  • रिझर्व्ह बँकेने युनियन बँक ऑफ इंडियाला KYC शी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि इतर कारणांमुळे 1.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • मुथूट हाऊसिंग फायनान्सला’नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी – हाउसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश, 2021′ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • याशिवाय निडो होम फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपये आणि अशोका विनियोग लिमिटेडला 3.1 लाख रुपयांचा दंडही रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

SL/ML/SL

13 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *