कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडातील मुख्य आरोपीचा मृत्यू

 कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडातील मुख्य आरोपीचा मृत्यू

सांगली, दि. 20 : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर गायकवाड गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक (Vikas Chowk)परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे डाव्या विचारांचे ज्येष्ठ नेते, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी उमाताई पानसरेही जखमी झाल्या होत्या.

या प्रकरणात १६ सप्टेंबर २०१५ रोजी विशेष तपास पथकाने सांगली येथून समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक केली होती. २०१६ मध्ये गायकवाडने उच्च न्यायालयात (High Court)जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली, जिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या जामिनाविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र उच्च न्यायालयानेही तो फेटाळला होता.पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे (Umatai Pansare)यांनी ओळख परेडमध्ये गायकवाडला हल्लेखोर म्हणून ओळखले नसल्याने त्याला जामीन मिळाल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत नमूद करण्यात आले होते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *