“माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित*

 “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित*

पुणे, दि ४
पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत “माय गो विठ्ठल” नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधूर आवाजात त्यांनी हे गाणं गायलं आहे.
गाण्याचे दिग्दर्शन आणि पटकथा निनाद म्हैसाळकर यांनी लिहिली आहे. चित्रीकरण राहुल पाडावे आणि मंदार मालोंडकर यांनी केलं आहे. कला दिग्दर्शन अमेय भालेरावने केल आहे ज्याला नुकताच श्यामची आई या चित्रपटासाठी फिल्म फेअर ही मिळाला आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर अनिष म्हैसाळकर आणि प्रोडक्शन हेड ऋचा मोडक म्हैसाळकर यांनी केल आहे. ईशान देवस्थळी याने मिक्स आणि मास्टरिंग केले आहे. या गाण्याची निर्मिती बॅचलर्स ऑफ मुंबई या कंपनीने केली आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर आधारित रील्स आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.
अभिनेत्री अमृता देशमुख “माय गो विठ्ठल” या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “संगीतकार निनाद म्हैसाळकर याने मला पहिल्यांदा गाण ऐकवलं त्याक्षणी मी त्याला गाण्यासाठी होकार दिला. गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेल्या गाण्यात माझा चेहरा दिसणार आहे ही गोष्ट माझ्या मनाला भावली होती. पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. वातावरण अगदी भक्तिमय असत. या गाण्याच्या निमित्ताने मी वारी अनुभवली. गाण अप्रतिम झालं आहे. प्रेक्षकांना हे गाण आवडत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम द्यावं.”
संगीतकार, दिग्दर्शक निनाद म्हैसाळकर या गाण्यामागच्या प्रवासाविषयी सांगतात, “गेली ७ वर्ष आम्ही बॅचलर ऑफ मुंबई कंपनीद्वारे वारीनिमित्त एक गाणं तयार करतो. आमच्यासाठी हीच वारी आहे. आम्ही या गाण्यात आमचा विठ्ठल शोधतो. यंदाचं आमचं माय गो विठ्ठल हे ८ व गाणं आहे. आम्ही याआधी विठ्ठलाची गाणी केली पण यावेळेस आम्ही रखुमाईला आमचं गाण अर्पण करत आहोत. विठ्ठलासोबत अख्ख्या विश्वाचा म्हणजेच संसाराचा गाडा रखुमाई आई देखील सांभाळ करत असते. जात्यावरची ओवी जितकी कठीण आहे तसेच हे गाणं सुद्धा शब्दात गुंफून लिहिले आहेत.”
गाण्याच्या चित्रीकरणाविषयी ते पुढे सांगतात,”जात जस गोल असत तशीच आपली पिढी आहे. संस्कारांची शिदोरी आजी नंतर आईकडे जाते मग मुलीकडे जाते. अश्या पद्धतीने हे वर्तुळ पूर्ण होतं. एक किस्सा सांगायचा झाला तर ज्या अभिनेत्रीला या गाण्यासाठी सिलेक्ट केल होत ती शूटच्या आधी आजारी पडली मग आम्ही शूटच्या दिवशी सकाळी अमृता देशमुखला विचारलं आणि तिने त्वरित होकार कळवला. विठ्ठलाचीच कृपा आहे. या कठीण प्रसंगी ज्या व्यक्तीच्या नशिबात हे गाण होत तिलाच मिळाल. संपूर्ण टीमने खूप मेहनत केली. खूप मज्जा करत हे शूट पूर्ण झालं प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. आम्ही यामुळे भारावून गेलो आहोत व एक नवी ऊर्जा आम्हाला मिळत आहे. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *