महायुतीच्या मंत्रिमंडळात चार महिला , अठरा नवीन चेहरे

 महायुतीच्या मंत्रिमंडळात चार महिला , अठरा नवीन चेहरे

नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीच्या आज नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात चार महिलांचा समावेश करण्यात आला असून 18 नवीन चेहरे या मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झाले आहेत. एकूण 39 मंत्र्यांना आज राजभवनात हिरवळीवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली.

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली, यात चार महिला महिलांचा समावेश आहे . तब्बल 18 नवीन चेहरे या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले असून त्यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील 10, विदर्भातील नऊ, ठाणे कोकण भागातील आठ, उत्तर महाराष्ट्रातील सात, मराठवाड्यातील सहा, तर मुंबईतील दोन चेहऱ्यांचा समावेश आहे.

आज झालेल्या शपथविधीत भाजपाच्या 19 , शिवसेनेच्या 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या मंगल प्रभात लोढा यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली, आज शपथ घेतलेल्या महीलांमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर साकोरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिथी तटकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

महायुतीच्या मंत्रिमंडळात चार महिला , अठरा नवीन चेहरे

ML/ML/PGB
15 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *