सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश….

 सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश….

मुंबई, दि. ३० : — राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो आणि नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश दिनांक 1 मे 2025 पासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली.

महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण आज मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते आज नरिमन भवन, मुंबई येथे करण्यात आले.

सुरक्षा रक्षकांच्या गणेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना आणि सुरक्षारक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्री यांनी ही मागणी मान्य करत केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता 1 मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे.

या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंध राहील . त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *