Mahindra BE 6 ‘बॅटमॅन’ एडिशन भारतात लाँच

 Mahindra BE 6 ‘बॅटमॅन’ एडिशन भारतात लाँच

मुंबई, दि. १५ : महिंद्राने वॉर्नर ब्रदर्ससोबत मिळून आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘BE 6’ चे खास बॅटमॅन एडिशन बाजारात आणले आहे. या लिमिटेड एडिशनमुळे BE 6 चा आकर्षक लूक अधिक शानदार झाला आहे. सॅटिन ब्लॅक रंगातील ही एसयूव्ही कस्टम डेकल्स आणि प्रीमियम इंटीरियरसह उपलब्ध आहे. गाडीचे बुकिंग 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी 20 सप्टेंबर रोजी ‘इंटरनॅशनल बॅटमॅन डे’ला सुरू होईल.

वैशिष्ट्ये

या एसयूव्हीला खास सॅटिन ब्लॅक रंग देण्यात आला आहे.
गाडीच्या पुढील दरवाजांवर बॅटमॅन डेकल्स आणि मागील बाजूस ‘द डार्क नाईट’ची बॅजिंग आहे.
हब कॅप्स, फ्रंट फेंडर्स आणि रिअर बंपरवर बॅटमॅनचा लोगो आहे.
यामध्ये 20-इंचचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
सस्पेंशन आणि ब्रेक कॅलिपर्सवर अल्कमी गोल्ड रंगाचा पेंट आहे, जो ब्लॅक रंगासोबत बोल्ड कंट्रास्ट तयार करतो.
गाडीच्या छतावर ‘द डार्क नाईट’ ट्रिलॉजीचे बॅट चिन्ह असलेले ‘इन्फिनिटी रूफ’ आहे.
यात ‘नाईट ट्रेल-कार्पेट लॅम्प्स’ आहेत, ज्यावर बॅटमॅनचे चिन्ह दिसते.

फीचर्स:
डॅशबोर्डवर गोल्डन रंगाची बॅटमॅन एडिशन प्लेट लावण्यात आली आहे, जी या गाडीची एक्सक्लुझिव्हिटी दर्शवते.
इंटीरियरमध्ये गोल्डन सेपिया स्टिचिंग आणि लेदरची प्रीमियम अपहोल्स्ट्री आहे.
स्टिअरिंग व्हील, टच कंट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकवरही गोल्डन एक्सेंट्स देण्यात आले आहेत.

किंमत
महिंद्रा BE 6 बॅटमॅन एडिशन ही एक लिमिटेड एडिशन असून, केवळ 300 युनिट्स तयार करण्यात आल्या आहेत. या गाडीची एक्स-शोरूम किंमत (Ex-showroom price) 27.79 लाख रुपये आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *