चिनाब नदीवरील पुलासाठी ‘ या ‘ महिला इंजिनिअरचे योगदान मोठे

 चिनाब नदीवरील पुलासाठी ‘ या ‘ महिला इंजिनिअरचे योगदान मोठे

बंगलोर दि ९– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब नदीवरील पुलासाठी प्रोफेसर माधवी लता यांचे योगदान मोठे आहे. त्या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत.

त्यांची शैक्षणिक वाटचाल :
Ph.D – IIT मद्रास
M.Tech – NIT वारंगल
B.E – JNTU काकीनाडा

त्यांचे संशोधन क्षेत्र आहे :

• भूकंप भू-अभियांत्रिकी (Earthquake Geotechnical Engineering)
• जिओसिंथेटिक्स आणि रॉक इंजिनीअरिंग

प्रोफेसर माधवी लता यांचे 70+ संशोधन पेपर्स जगभरातील नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. 2016 ते 2022 या काळात त्या Indian Geotechnical Journal च्या संपादक पण राहिल्या आहेत. 2022 मध्ये भारताच्या Top 75 Women यादीत त्यांचा समावेश झाला होता तर 2024 मध्ये Indian National Academy of Engineering मध्ये ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली होती.

चिनाब नदीवरील रेल्वे पूल तयार करण्यामागे जिथे अनेक इंजिनीअर्सची टीम होती, तिथे माधवी लता यांच्या भूमिकेचा एक खास ठसा आहे. पुलाचा पाया, रचना आणि सुरक्षा याची अत्यंत जटिल जबाबदारी त्यांच्यावर होती. भूस्खलन, भूकंप प्रवण भाग, उंच खोऱ्यांमधील हवेचा वेग, अश्या सगळ्या अडचणींवर त्यांनी विज्ञान, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर मात केली.

तब्बल 17 वर्षे या प्रकल्पावर सातत्याने काम करून, त्यांनी भारतीय रेल्वे आणि संपूर्ण देशाला गर्वाचा क्षण मिळवून दिला. प्रोफेसर माधवी लता यांच्या कार्याला सॅल्युट !

जय हिंद! 🇮🇳

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *