दिल्ली सरकारात महिला राज आमने सामने- विरोधीपक्ष नेतेपदी अतिशी

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तातरानंतर महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कारभार हाती घेतला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेतेपदही महिला नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीच्या माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी आता दिल्लीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. त्यामुळे आता सत्तेत आमने-सामने बसलेले महिला राज दिल्लीचा कारभार कसा चालवतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभव पत्कारावा लागल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून २५ फेब्रुवारी रोजी सर्व आमदार पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपच्या नेत्यांनी आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली.
निवडणूक निकालानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या विजयी उमेदवारांनी भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी त्यांना लोकांसाठी काम करण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा सल्ला दिला. पक्ष रचनात्मक विरोधक म्हणून काम करेल असे आतिशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी सांगितले.
SL/ML/SL
23 Feb. 2025