महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी
आळंदी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली.अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.
अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
ML/ML/PGB
28 Aug 2024