महिलांना रोजगारासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. हा उपक्रम अनुसूचित जाती, जमाती, मुक्त जाती आणि भटक्या जमातीतील दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने अनेक कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत येतो. 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, विशेषत: मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय कल्याणकारी योजना महिला व बालकल्याण दिव्यांग कल्याण तसेच क्रीडा धोरणासाठी अंदाजपत्रकात त्यासाठी एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
त्यानुसार महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत या वर्षापासून मागासवर्गीय युवक व युवतींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे.
ही योजना महापालिका हद्दीतील मागासवर्गीयांसाठी आहे. या वर्गांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कौशल्य विकासावर भर देईल. या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याचे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी जाहीर केले.
घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या महिला व त्यांच्या मुलांसाठी विविध योजना आहेत. चालू आर्थिक वर्षात २९५ महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. शहरातील महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
आगामी २०२४ व २५ या आर्थिक वर्षात दिव्यांगांसाठी त्याच धर्तीवर स्वतंत्र विशेष उद्यान उभारले जाणार आहे. यात दिव्यांगांना सहज हाताळता येईल, असे साहित्य उभारले जाणार आहे. गंगापूर रोडवरील कानिटकर उद्यानामध्ये अशा प्रकारच्या सोयी उभारण्याचे नियोजन आहे.
ML/KA/PGB
21 Feb 2024