महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

 महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही :  सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सुरक्षेचा मुद्दा सोडवावा लागेल, असे सांगितले.

सरन्यायाधीश म्हणाले, “पश्चिम बंगाल सरकारने या अधिसूचनेत बदल करायला हवा. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही महिलांना नाईट ड्यूटी करण्यापासून रोखू शकत नाही. पायलट आणि लष्करात जवान रात्री सुद्धा काम करतात.”

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या तपास अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सीबीआयचा स्टेटस रिपोर्ट चिंताजनक आहे. सीबीआयने या प्रकरणात नव्याने स्टेटस रिपोर्ट सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले.

PGB/ML/PGB
17 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *