भारतीय महिला संघाची आशिया कप फायनल मध्ये धडक
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वेगवान गोलंदाज रेणुका सिंहच्या तीन विकेट्स आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या भारताने बांगलादेशवर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने महिला आशिष चषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या भारताचा सामना रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासंघाशी होणार आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश अर्धा संघ ३५ धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. निगार सुलताना वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही आणि बांगलादेशला २० षटकांत ८० धावापर्यंत मजल मारता आली.बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने ५१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. भारताकडून रेणुका सिंहने भेदक गोलंदाजी केली. तिने चार षटकात २.५ च्या इकोनॉमीने १० धावांत ३ विकेट्स घेतल्या. यासोबत तिने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या. त्याच्याशिवाय राधा यादवने १४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
PGB/ML/PGB 26 July 2024