तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू आहे.
फॉर्म भरलेल्या पैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. बँकेकडूनच लाभार्थ्यी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे
PGB/ML/PGB
9 Sep 2024