महायुतीचे रावसाहेब दानवे यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज…

 महायुतीचे रावसाहेब दानवे यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज…

जालना, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कडे दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला.

जालना लोकसभा मतदार संघाचे पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपाने सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून लोकसभा निवडणुकीत सहाव्यांदा षटकार मारण्यासाठी दानवे सज्ज झाले असून त्यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे, बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हे उपस्थित होते. दरम्यान उद्या दानवे भाजपाच्या बड्या नेत्यांसह मोठे शक्ती प्रदर्शन करणार असून त्यांची उद्या जाहीर सभा देखील होणार आहे.

ML/ML/SL

23 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *