राज्यात अखेर महायुतीच, मुख्यमंत्री कोण याकडे लक्ष

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर झालेल्या १५ व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. महायुतीने २८८ पेैकी २३० जागांवर (भाजप – १३२
शिवसेना शिंदे गट -५७ राष्ट्रवादी कॉंग्रेस -४१ ) निर्विवाद वचस्व मिळवले असून अन्य पाच उमेदवारांनी महायुतीला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळेच २३५ या जादुई आकड्यासह महायुतीने अगदी सहज बहुमत मिळवले आहे. तर महा विकास आघाडीतील तीन मुख्य पक्षांना मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -२०, कॉंग्रेस – १६, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट – १० – एकूण ४६ ) अर्धशतकही गाठता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता युतीतील प्रमुख नेत्यांमध्ये राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन अटीतटीचा समाना होणार असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विजयाच्या आनंद एकत्र साजरा केल्याचे दिसत असले तरीही मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण २८८ विधानसभा जागांपैकी पक्षनिहाय जिंकलेल्या जागा पुढील प्रमाणे –
भाजप – १३२
शिवसेना शिंदे गट -५७
राष्ट्रवादी कॉंग्रेस -४१
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -२०
कॉंग्रेस – १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट – १०
समाजवादी पक्ष – २
सन सुराज्य शक्ती – २
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पक्ष – १
राष्ट्रीय समाज पक्ष -१
AIMIM – १
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – १
भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष १
राजर्षी शाहू विकास आघाडी –
अपक्ष – २
SL/ML/SL
23 Nov. 2024