महायुतीने जाहीर केला दहा कलमी वचननामा, भरघोस आश्वासनांची खैरात

 महायुतीने जाहीर केला दहा कलमी वचननामा, भरघोस आश्वासनांची खैरात

कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे सांगत काल आपल्या पहिल्या संयुक्त जाहीर सभेत महायुतीच्या नेत्यांनी दहा नवीन आश्वासने देत आपला वचननामा जाहीर केला त्यात मतदारांना खूष करण्यासाठी योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. यासाठी पैसे कुठून येतील याबाबत मात्र अस्पष्टतता आहे.

काल कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त जाहीर सभा झाली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते. महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेसाठी दहा नव्या योजना सुरू करण्यात येतील त्यातून जनतेचे हित साधण्यात येईल असा विश्वास या नेत्यांनी दिला . यातील काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्या नव्या स्वरूपात सादर केल्या आहेत.

काल जाहीर करण्यात आलेली महायुतीची दहा वचने खालील प्रमाणे आहेत…..

1.लाडक्या बहिणींना ₹2100
प्रत्येक महिन्याला ₹ 1500 वरून ₹2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन !

2.शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ₹15,000
प्रत्येक वर्षाला ₹12,000 वरून ₹15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन !

3.प्रत्येकास अन्न आणि निवारा
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन !

4.वृद्ध पेन्शनधारकांना ₹2100
महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन !

5.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन !

6.25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000
प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे वचन !

7.45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार
राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन !

8.अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन !

9.वीज बिलात 30% कपात करून
सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन !

10.सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029’
100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

ML/ML/SL

6 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *