वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

 वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

वेदान्त foxcon बद्दल महाविकास आघाडीने वेळेत निर्णयच घेतला नाही

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच १७ मार्च २०२२ ला झालेल्या प्रकल्पांसाठीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वेदांता -फॉक्सकॉन संदर्भातील कोणताही विषय अंतर्भूत नव्हता मात्र महायुती सरकार आल्यानंतर १५ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कंपनीला देऊ केल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याआधीच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असे राज्य सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या श्वेत पत्रिकेत म्हटले आहे. ही पत्रिका आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आली.

आघाडी सरकारने देऊ केलेल्या प्रोत्साहनांच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त प्रोत्साहने देण्याचे अधिकार मंत्रिमंडळाच्या उपसमितीला आहेत मात्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्यापूर्वीच हा प्रकल्प कंपनीने गुजरातला नेला असा घटनाक्रम या श्वेतपत्रिकेत देण्यात आला आहे.

एअर बस प्रकल्पाच्या बाबतीत एअर बस टाटा या बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांच्या नियोजित प्रकल्पाबाबत गुंतवणुकीसाठी एमआयडीसीसोबत सामंजस्य करार केलेला नव्हता त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचा कोणताही पत्रव्यवहार केंद्रीय मंत्रालयाला किंवा टाटा कंपनीशी करण्यात आला नव्हता असे या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे.

सॅफ्रोन प्रकल्पाबाबत देखील एमआयडीसीचा संरक्षण विभागाशी कोणताही करार पत्रव्यवहार झालेला नव्हता तसंच बल्क ड्रग पार्क बाबतचा राज्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही मात्र हा प्रकल्प राज्याच्या स्वनिधीतून करण्याचं नियोजित असून यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरु आहे,असं श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे.  Mahavikas Aghadi did not take a decision about Vedanta Foxcon in time

ML/KA/PGB
3 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *