महाराष्ट्राचा सुपुत्र ठरला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता देशविदेशातील क्रीडापट्टू सज्ज होत आहेत. महाराष्ट्रासाठी आज आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र बीड येथील धावपट्टू अविनाश साबळे या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.रविवारी पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश सहाव्या स्थानावर राहिला. यामुळे तो २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारताकडून अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा सहावा खेळाडू ठरला आहे.
राष्ट्रीय चॅम्पियन साबळेने ८:११.६३ मिनिटात हे अंतर पूर्ण केले, जे त्याच्या ८:११.२० या राष्ट्रीय विक्रमापेक्षा थोडे चांगले आहे. २८ वर्षीय खेळाडूने मात्र पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीच्या वेळेआधीच ही स्पर्धा पूर्ण केली. ८:१५ सेकंदांच्या फरकाने मोठ्या फरकाने त्याने ही कामगिरी केली. पात्रता कालावधी १ जुलै २०२३ पासून सुरू झाला असून ३० जून २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातील अविनाश साबळे याने टोकियो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. रयाबीत डायमंड लीग स्पर्धेत त्याने 300 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 8:12:48 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता, तर अविनाशनं आत्तापर्यंत 9 वेळा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. अविनाश साबळे यानं बर्मिंगहॅममधल्या (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास घडवला होता. त्यानं तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत अविनाशनं जिंकलेलं भारताचं आजवरचं पहिलं पदक ठरलं.
अविनाश साबळे दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
SL/KA/SL
17 July 2023