महाराष्ट्राचा चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. 17 राज्यांचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते.
या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती तर ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला सुबक आणि आकर्षक मूर्त स्वरुप देण्याचे काम केले.
संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली.
SL/KA/SL
30 Jan. 2023