मुंबईत रिपब्लिकन पक्षाची 29 जुन रोजी महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान कसे पराभुत करायचे आणि महायुतीला कसे विजयी करायचे,महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पक्षाने सिंहाचा वाटा उचलण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाताना पूर्वतयारी आवश्यक आहे.या पार्श्वभुमीवर रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कमीटीची महत्वपूर्ण बैठक येत्या शनिवारी 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालय समोर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी आयोजीत केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी दिली. या बैठकीला फक्त राज्य कमिटीचे पदाधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षाना निमंत्रीत करण्यात आले आहे ,अशी माहिती गौतमभाऊ सोनवणे यांनी दिली.
रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपद देऊन रिपब्लिकन पक्षावर भाजपाने दाखविलेल्या विश्वासाला रिपब्लिकन पक्ष तडा जावून देणार नाही.येणाऱ्या विधानसभेत रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजपसह महायुतीचे काम करणार आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याचा समाजात फुट पाडणार विषारी प्रचार केला होता.मात्र तो आरोप खोडुन काढण्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मोठे यश आले.रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या साथीमुळे भाजपाला देशभरात सर्वाधीक जागा जिंकता आल्या आहेत. आगामी विधानसभेत भाजपसह आरपीआय ताकदीने उमेदवार जिंकुन आणणार आहे.असे गौतमभाऊ सोनवणे यांनी सांगितले.
SW/ML/SL
26 June 2024