महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. अशोक केळकर पुरस्कार

 महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. अशोक केळकर पुरस्कार

पुणे,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवण्याचा मान यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेला लाभला आहे. राज्य शासनाच्यावतीने मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल  हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप

दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा अभिप्राय

परिषदेने आजवर केलेल्या कामाची दखल घेतली गेली याचे समाधान वाटते. परिषदेच्या ११७ वर्षांच्या इतिहासात अनेक थोर सारस्वतांनी आणि साहित्यप्रेमींनी वाङ्‍‍मय सेवकांची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारुपाला आणले. त्यांच्या योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करण्यात परिषदेला धन्यता वाटते. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत राहिलेल्या परिषदेचे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवित साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे.डॉ. अशोक केळकर

भारतीय भाषा संस्थान (मैसूर), मराठी अभ्यास परीषद (पुणे), राज्य मराठी विकास संस्था यांची स्थापनेमागे डॉ. केळकर आहेत. मराठी अभ्यास परीषदेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. परीषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे पहिले संपादक डॉ. केळकर होत.
डॉ. केळकर यांच्या ‘रुजवात’ या पुस्तकाला 2008 मध्ये साहित्य अकदामी पुरस्काराने गौरविण्यात आले. आस्वाद मीमांसा, चिन्ह मीमांसा, सांस्कृतिक मानव विज्ञान यासारखे त्यांचे अनेक समिक्षात्मक ग्रंथ उल्लेखनीय मानले जातात. त्रिवेणी, कवितेचे अध्यापन, वैखरी, मध्यमा, मराठी भाषेचा आर्थिक संसार, भेदविलोपन एक आकलन, प्राचिन भारतीय साहित्य मीमांसा एक आकल ही मराठीतील त्यांचे पुस्तके विशेष गाजली. ‘
प्राचिन भारतीय साहित्य मीमांसा एक आकलन’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. द फोनॉलॉजी आणि मॉरफॉलॉजी ऑफ मराठी, स्टडीज इन हिंदी-उर्दू लॅंग्वेज इन अ सेमियॉटीक पर्सपेक्टीव्ह, फ्रॉम अ सेमियॉटीक पॉंईट ऑफ व्ह्यू : कलेक्शन बुक ऑफ स्टोरीज इत्यादी संशोधनात्मक ग्रंथसंपदा त्यांनी इंग्रजीतही लिहिली आहे.

 

SL/KA/SL

16 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *