केंद्राकडून करहस्तांतरणापोटी महाराष्ट्राला मिळाले 8828 कोटी
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद आहे. ही रक्कम जारी केल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 जून 2024 पर्यंत राज्यांना एकूण 2,79,500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वांधिक रू. 25069.88 कोटी उत्तर प्रदेशच्या खात्यात जमा झाले आहेत तर सर्वांत कमी म्हणजेच रू. 539.42 गोव्याला मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला रू. 8828.08 कोटी आले आहेत.
केंद्र सरकारने जून 2024 या महिन्यासाठीच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या महिन्यात वितरित करण्यात आलेली संचित रक्कम 1,39,750 कोटी रुपये झाली आहे. यामुळे राज्य सरकारांना विकासाला आणि भांडवली खर्चाला चालना देता येईल.
SL/ML/SL
11 June 2024