IPL च्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रिमिअर लिगचे आयोजन

 IPL च्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रिमिअर लिगचे आयोजन

Maharashtra Cricket Association

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL चा थरार काही दिवसांपूर्वीच संपला असताना आता क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी सुरू होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमिअर लिगचे सामन्यांचे आयोजन केले आहे. १५ ते २९ जून या कालावधीत पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीअममध्ये हे क्रिकेट सामने होणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहीत पवार यांनी BCCI च्या विद्यमाने महाराष्ट्र प्रिमिअर लिग ही पुरुषांची T- 20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

MPL 2023 च्या पहिल्या हंगामात ६ संघ स्पर्धेत उतरणार आहेत.

संघ आणि MPL आयकॉन खेळाडू

१. पुणे – ऋतूराज गायकवाड
२. कोल्हापूर- केदार जाधव
३. नाशिक – राहुल त्रिपाठी
४. छत्रपती संभाजी नगर – राजवर्धन हंगरगेकर
५. रत्नागिरी- अजीम काजी
६. सोलापूर – विकी ओस्तवाल

आयपीएल प्रमाणे या लीगमध्ये खेळाडूंना सुविधा मिळणार आहेत. आयपीएलचेच नियम या लीगमध्ये लागू असणार आहेत. आयपीएलला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील महाराष्ट्रात टी २० लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे.
आता उद्या होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत किती कोणता संघ अधिक कोटीच्या कोटी उड्डाणे घेतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

SL/KA/SL

5 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *