महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई, दि. १ : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. १२६ जणांच्या या कार्यकारिणीत खजिनदारपदी अनिकेत नवले व अक्षय जैन, संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार आणि प्रशासन सरचिटणीसपदी विवेक गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय तनवीर विद्रोही, प्रशांत ओगले, प्रथमेश अबनावे, कपिल ढोके, अनुराग भोयर, आमेर अब्दुल सलीम, दिप्तेश परब, आफरीन हुसेन यांची उपाध्यक्ष पदी तसेच ४४ सरचिटणीस आणि ७४ प्रदेश सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या कार्यकारिणीत सर्वसामान्य कुटुंबातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत तळागाळात काम करणाऱ्या आणि संघटनेसाठी सातत्याने झटणाऱ्या युवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे युवकांमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल आणि युवक काँग्रेसबद्दल आशादायी वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील व युवकांच्या प्रश्नांवर जोरदार आंदोलने करतील असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *