परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र सरस, मुख्यमंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असून, गेल्या सहा महिन्यात किती गुंतवणूक आली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी दिली आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. तर, फक्त सहाच महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे, असे फडणवीसांनी सांगितले.