या जिल्ह्याला मिळाला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा मान

 या जिल्ह्याला मिळाला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा मान

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असलेली महाराष्ट्र केसरी या वार्षिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान  करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यावर्षी अहमदनगर जिल्हाला मिळाला असून वाडिया पार्क मैदानात हे सामने खेळवले जातील. अशी माहिती  संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी दिली आहे.

३१ डिसेंबरला या चुरशीच्या अंतिम फेरीतून महाराष्ट्र केसरी ठरणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते विजेत्याला चांदीची गदा  देऊन सन्मानित करण्यात येईल.

महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 1961 मध्ये सुरु झाली. त्यावेळी बक्षिस म्हणून विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येत होती. मात्र 1982 पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा बक्षिसच्या रुपात दिली जाते. या स्पर्धेत पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती.

गतवर्षी कोल्हापूरचा कुस्तीपटू  पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला होता. झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

Maharashtra Kesari Tournament Wrestling Tournament 2022

SL/KA/SL

8 Dec. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *