एकाच छताखाली योजनांचा थेट लाभ देणार महाराष्ट्र राज्य हे पहिलं..

बुलडाणा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकाच छताखाली विविध योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ देणार देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी 66 लाख लाभार्थ्यांना थेट मदत करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन बुलढाणा येथे केली .
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज झाला या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मृद जलसंधारणमंत्री संजय राठोड ,खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हयातील सर्व आमदार उपस्थितीत होते. एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.
यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांपैकी ई केवायसी झालेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात आले महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पीक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांना पैकी 51 हजार 738 लाभार्थाना आज मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते एक लिंकव्दारे ऑनलाईन पद्धतीने मदतीचे वाटप करण्यात आले….
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की जालना येथे झालेला लाठीचार हा दुर्दैवी असून जिल्हा पोलीस अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे , काही पोलीस अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे तर काहींचं निलंबन करण्यात आल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले… जालना येथील लाठीचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करणार असल्यास त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची वेळप्रसंगी न्यायालयीन चौकशी करू… मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण वचनबद्ध असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं. Maharashtra is the first state to provide direct benefit of schemes under one roof.
राज्यात आमचे सरकार आल्यापासून जवळपास 58 कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या परंतू या बैठकांमध्ये केवळ जनतेच्या हिताचे लोकांच्या जनतेच्या सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आले यामध्ये यामध्ये एकही निर्णय कोणालाही वैयक्तिक लाभाचा होईल असा घेतला नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. हे सर्व सामान्याचे सरकार आहे सर्वसामान्यांचे नाळ जुळलेले सरकार आहे रस्त्यावर उतरून काम करणारे हे सरकार आहे. फेसबुक लाईव्ह वरून चालणारे हे सरकार नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची होईल तोपर्यंत तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव जाधव यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/KA/PGB
3 Sep 2023