कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

 कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव करण्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा २०२४ चा दुसरे जागतिक कृषी आणि धोरण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राला जाहीर करण्यात आला.

मुंबई युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून शाश्वत विकास धोरण राबविली जात आहेत. या सर्व प्रयत्नांची आणि पर्यावरण, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उचललेल्या पावलांची दखल घेत ”वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा” २०२४ चा दुसरे जागतिक कृषी, पर्यावरण पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झाला आहे.

फोरमच्या चेअरमन प्रा.रुडी रॅबिंग्ज यांनी ही माहिती दिली. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे २६ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे २०१८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी शास्त्रज्ञ प्रा. स्वामीनाथन या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पहिल्या पुरस्कारचे मानकरी ठरले आहेत.

PGB/ML/PGB
3 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *