राज्यातील महापालिका निवडणुकीत अंदाजे सरासरी पंचावन्न टक्के मतदान
मुंबई, दि. 15 : आज महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर २८ महानगरपालिकांमध्ये सुमारे ५० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर लगेचच बोलताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २९ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदानाची टक्केवारी ४६-५० टक्के दरम्यान होती. मतदानाचे अचूक आकडे नंतर जाहीर केले जातील, असे एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकांमध्ये २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात होते. उद्या (१६ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून, यामध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक 50.85% इतके विक्रमी मतदान झाले आहे, तर जळगावमध्ये सर्वात कमी म्हणजेच 34.27% मतदानाची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी मुंबईत 41.08% मतदान झाले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनुक्रमे 36.95% आणि 40.50% मतदान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी (46.23%) आणि सांगली-मिरज-कुपवाड (41.79%) मध्येही मतदारांनी उत्साह दाखवला आहे.
अहिल्यानगरमध्ये 48.49%, मालेगावमध्ये 46.18% आणि नाशिकमध्ये 39.64% मतदान झाले. मराठवाड्यातील परभणीमध्ये 49.16% आणि जालना येथे 45.94% मतदान झाले असून, छत्रपती संभाजीनगर (43.67%), लातूर (43.58%) व नांदेड (42.47%) मध्ये मध्यम स्वरूपाचे मतदान झाले. विदर्भातील नागपूरमध्ये 41.23%, अकोल्यात 43.35% आणि अमरावतीमध्ये 40.62% मतदारांनी आपला हक्क बजावला, तर चंद्रपूरमध्ये हा आकडा 38.12% इतका राहिला.
कोकण आणि मुंबई लगतच्या भागात नवी मुंबई (45.51%), वसई-विरार (45.75%) आणि पनवेल (44.04%) मध्ये मतदानाचा टक्का चांगला राहिला आहे. ठाणे (43.96%) आणि मिरा भाईंदर (38.34%) मध्ये मतदारांचा प्रतिसाद संमिश्र होता, तर उल्हासनगरमध्ये केवळ 34.88% मतदान झाले. एकूणच निम्म्याहून अधिक शहरांमध्ये मतदानाचा टक्का 40 ते 45 च्या दरम्यान असून, काही ग्रामीण भागांशी निगडित शहरांमध्ये हा टक्का 50 च्या जवळ पोहोचल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाला उशिरा सुरुवात झाली, त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.
SL/ML/SL