महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा आज जाहीर केल्या. त्याचबरोबर आजपासून राज्यात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ या निवडणूका २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत. तर २३ नोव्हेंबर ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. मतदानासाठी महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र उभारण्यात येतील . या मध्ये 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि 42 हजार 582 शहरी पोलिंग स्टेशन राहतील, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
राज्यातील मतदारांची संख्या
- एकूण मतदार – ९ कोटी ६३ लाख
- पुरुष मतदार ४ कोटी ९३ लाख
- महिला मतदार – ४ कोटी ६६ लाख
- तरुण मतदारांची १ कोटी ८५ हजार
- पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण मतदार – २० लाख ९३ हजार
- दिव्यांग मतदारांची 6 लाख 2 हजार
- दिव्यांग मतदार – 6 लाख 2 हजार
- ज्येष्ठ नागरिक मतदार – १२ लाख ५ हजार
विशेष म्हणजे 85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठीं रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती निवडूण आयुक्तांनी दिली. सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या आत असावेत, असे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
अर्ज सादर करण्याची मुदत
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.आजपासून ३९ दिवसांनी राज्यात कोणाची सत्ता येईल ते स्पष्ट होणार आहे.
दरम्यान या निवडणूकीच्या कालावधीतच नांदेड येथील पोट निवडणूक ही २० तारखेलाच होणार आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला त्यामुळे ती जागा ही रिक्त झालेली आहे तिथे १३ तारखेला मतदान होणार आहे.
SL/ML/SL
15 Oct. 2024