पाच वचने देत , महाराष्ट्र द्रोह्याना सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यास पाच वचने देत , राज्य विधानसभेची निवडणूक, ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यामधली निवडणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र द्रोह्याना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष, उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोल्हापूरात राधानगरी मतदार संघात आयोजित, प्रचारसभेत ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रेमींनो, अशा शब्दांत, त्यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली.
निवडणूकी वेळी धर्मांचे राजकारण करण्याचे, भाजपाचे धोरण आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यातले अनेक प्रकल्प, अदानी यांनी दिले जात असून, अदानी आणि भाजपाला मदत करणारे राज्याचे शत्रू आहेत, असा आरोप ही त्यांनी त्यांनी केला.
राज्यातले प्रकल्प, महागाई वाढ तसंच महिलांची असुरक्षितता, या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करत, सरकार आल्यानंतर, प्रत्येक जिल्ह्यात, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सूरतमध्ये देखील, शिवरायांचे मंदिर उभारणार, असे ते म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील, मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देऊ, अशी आश्वासने त्यांनी यावेळी दिली.
ML/ML/PGB
5 Nov 2024