महाराष्ट्रासह या १२ राज्यांत उद्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ जागांसाठी मतदान

 महाराष्ट्रासह या १२ राज्यांत उद्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ जागांसाठी मतदान

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल जागेवर बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघात मतदान उद्या होईल. उद्या महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदानसंघांमध्ये मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 1,198 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1,097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत. एक उमेदवार तृतीयपंथी आहे.

महाराष्ट्रातील मतदानाचे वेळापत्रक

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

१९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार असून तर ४ जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागणार आहेत. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

SL/ML/SL

25 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *