महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा.

 महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा.

मुंबई, दि १
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) परिसरातील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे भेट दिली. महापौर श्रीमती तावडे यांनी हातात कुंचला घेत कॅनव्हासवर चित्र रेखाटले. माटुंगा येथील फाईव्ह गार्डन मध्ये शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ग्रँट रोड ( पश्चिम ) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी भेट दिली. तसेच, वांद्रे परिसरातील एमआयजी क्लब येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी उपायुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, सहाय्यक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त श्री. मनीष वळंजू आदी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *