महामानवाला द्यावी, शैक्षणिक मानवंदना, एक वही ,एक पेन अभियानचे आवाहन

 महामानवाला द्यावी, शैक्षणिक मानवंदना, एक वही ,एक पेन अभियानचे आवाहन

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देणारे घटनाकार ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वह्या,पेन पुस्तकांची शैक्षणिक मानवंदना देवून अभिवादन करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान आणि एक वही, एक पेन अभियानचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. बाबासाहेबांना तेच खरे अभिवादन आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते विद्यार्थी म्हणुन शिकतच होते. शिक्षणाच्या बळावर त्यांनी अनेक विषयांवर त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली. लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर डॉक्टरेट केलेली आहे. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला होता त्यामुळे त्यांच्या 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी हार ,फुले, मेणबत्ती, अगरबत्ती या नाशवंत वस्तूं ऐवजी त्यांना वह्या, पेन , पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे अभिवादन केल्यास तीच त्यांना ख-या मानवंदना राहील असे झनके यांनी म्हटले आहे.

जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य समाजातील गोरगरीब आदिवासी तसेच गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावे. असे सांगतानाच दादर चैत्यभूमीवर येताना सोबत शैक्षणिक साहित्य घेवून यावे. सूर्यपुत्र भैय्या साहेब आंबेडकर स्मृतीस्थळ चैत्यभूमी दादर या ठिकाणी हे साहित्य महामानव प्रतिष्ठान तथा भारतीय बौद्ध महासभा आयोजित एक वही ,एक पेन अभियानच्या स्टॉल वर जमा करावे. अधिक माहिती तसेच सहभाग नोंदविण्यासाठी 9372343108 या क्रमांकावर संपर्क साधावा
असे आवाहन झनके यांनी केले आहे.

ML/ML/PGB 5 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *