श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

 श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

पुणे दि २ : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वषार्तून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे.

डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते.

विजयादशमीला रात्री ९ वाजता प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रम

विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर रात्री ९ वाजता करण्यात आले आहे. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात येईल. प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी केले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *