विदर्भात उत्साहात महालक्ष्मी सणाला सुरुवात

यवतमाळ दि.१– विदर्भात मोठ्या उत्साहात महालक्ष्मी सणाला सुरुवात झालेली आहे. विधिवत पूजाअर्चा करून ज्येष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. काही घरी दोन झोलबा असतात तर काही ठिकाणी एक झोलबा असतो. यावेळी महालक्ष्मीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरी आकर्षक सजावट केली जाते . अतिशय पवित्र वातावरणात हा सण सुरू झालेला आहे . यावेळी ज्यांच्याकडे महालक्ष्मी असेल त्यांच्याकडील जे कोणी सदस्य बाहेरगावी असतात ते आवर्जून या सणाला येतात. यानिमित्त सदस्यांचे एक कौटुंबिक स्नेहमिलन सुद्धा होते. अशा या महालक्ष्मी सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे .ML/ML/MS