महालक्ष्मी मंदिरास भेट स्वरूपात मिळाला दुर्मिळ खजिना

 महालक्ष्मी मंदिरास भेट स्वरूपात मिळाला दुर्मिळ खजिना

कोल्हापूर दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संदर्भात ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झालं आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर! यामंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्तांना मंदिराचा आणि कोल्हापूर शहराचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता असते. यासाठी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संदर्भात ग्रंथालय उभा करण्यात येणार आहे. Mahalakshmi temple received a rare treasure as a gift.

याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झालं असल्याची माहिती शिवराज नाईकवाडी यांनी दिली.

हस्तलिखित शके १७८६ मधील असून गुरू चरित्रचं हस्तलिखित तर आहेच; शिवाय दुर्मिळ देखील आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा गाणगापूर नरसिंहवाडी तसंच कारंजा इथल्या मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचं चरित्र असल्याचं धर्मशास्त्र मार्गदर्शक आणि इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर यांनी म्हटलं आहे.

हे हस्तलिखित पूर्वीच्या हातभट्टीच्या कागदावर नैसर्गिक शाईपासून तयार करण्यात आलं आहे. अशा हस्तलिखित ग्रंथांच्या संदर्भांचा वापर करीत पुस्तक निर्माण होत असतं, असंही त्यांनी सांगितलं.

या ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून आणखी काही माहिती किंवा असे ग्रंथ, हस्तलिखित भाविकांकडे असतील तर ते मंदिरासाठी द्यावेत, असं आवाहन ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचीव शिवराज नाईकवाडे यांनी केलं आहे.

ML/KA/SL

19 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *