महालक्ष्मी रेसकोर्स विकास बिल्डरांच्या मोफत FSI साठी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत मुंबईतल्या रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुरव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं.
दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता.. कोस्टल रोडचं काम पूर्ण देखील झालं नाही. तरी केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला जातोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.
कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उध्दव ठाकरे यांचं ते स्वप्न होतं.. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो.. आमचं सरकार असतं तर सगळी कामं आम्ही वेळेत पूर्ण केली असती असा दावा त्यांनी केला.
महालक्ष्मी प्रकल्प बिल्डरांच्या मोफत FSI साठी
मुख्यमंत्र्यांचं बिल्डर सोबत साटेलोटे सुरू होते, तबेले बांधले जाणार आहेत. पण घोडे हे सुटा बुटतील लोकांचे आहेत. ज्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत.. पण जनतेचा पैसा त्या साठी का वापरला जातोय ? लाच देणं सुरू होतं. आत्ता सेंट्रल पार्क चा घाट घातला जातोय ! कोणत्या बिल्डर साठी हे सुरू आहे ? सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं. पण प्रकल्प उभारताना बाजूच्या कोणत्या SRA मध्ये अजू बाजूच्या लोकांना सामावून घेणार ? पण मोफत FSI मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला देणार आहात असा सवाल आदित्य यांनी करत.
मोठ्या प्रमाणात या पार्क ला विरोध होतोय असं सांगितलं.
यावेळी बोलताना ‘आम्ही प्रश्न घेतल्यानंतर क्लब हाऊस कॅन्सल झालंय. पण आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही.. आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकर योगा, मॉर्निंगवॉक साठी होतो.. असं आदित्य ठाकरे म्हणाले . तसंच इथे 100 कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण IRWTC हे स्वतः देखील ते करू शकत होतं.. सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटा बोलतायत IRWITC ला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते.. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे..
आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो.. पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलतायेत. लोकांचा विरोध आहे.. याची आठवण सरकार आणि प्रशासकाना आदित्य ठाकरे यांनी करून दिली.
महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे आणि एकनाथ शिंदे गँग लीडर
या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले . राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवतानाचं आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अराजकता पत्रकार परिषदेतून मांडली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘कॅबिनेट मीटिंग मध्ये कायदा , सुव्यवस्था राहिली आहे का ? सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करता आणि अश्या आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केलं जातं. तर यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात, आमदाराचा मुलगा अपहरण करतो हे सगळं कॅमेरा मध्ये कैद होतंय.. यांच्यावर UAPA कायद्याने कारवाई व्हायला हवी होती.. आता भाजपने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, असं म्हणत आव्हान आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिलं..
ML/KA/PGB 4 Feb 2024