लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला महाद्वार घाट…
सोलापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशी दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेचा महाद्वार घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. प्रतिवर्षी प्रमाणे धनत्रयोदशी दिवशी पंढरपुरात दीपोत्सव साजरा करून दिवाळीचा शुभारंभ केला जातो.
त्यानुसार यंदाही महाद्वार घाटावर तब्बल १ हजार १०० दिवे लावून दीपावलीची प्रकाशमय सुरुवात करण्यात आली. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला महाद्वार घाट…
बडवे – उत्पात सेवाधारी यांच्या वतीने ॲड. आशुतोष बडवे पाटील यांच्या माध्यमातून हा दिपोत्सव साजरा होत असतो. या दीपोत्सवास पंढरपूरकर नागरिकांसह वारकरी भक्तांनी देखील सहभाग घेऊन चंद्रभागेच्या किनारी दिवे लावले. त्यामुळे सायंकाळी दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण महाद्वार घाटाचा परिसर उजळून निघाला होता.
ML/KA/PGB
10 Nov 2023