कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात

कोल्हापूर, दि. ६ :
न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूरातील नांदणी मठातील प्रसिद्ध महादेवी उर्फ माधुरी हत्तीण रिलायन्सच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आली होती. यावरुन गेले आठवडाभर कोल्हापूरकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विविध माध्यमांतून दिसणारा कोल्हापूरकरांचा रोष पाहता,राज्य सरकारने देखील यात लक्ष घातले होते. अखेर आज वनताराने नमते घेतले असून लवकरच महादेवी कोल्हारात परतणार आहे. वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरकरांचा हा मोठा विजय आहे.
हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्यात यावं यासाठी कोल्हापूरकर प्रचंड आक्रमक झाले होते. कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती. कोल्हापूरकरांनी जिओच्या वस्तूंवरही बहिष्कार टाकला होता. कोल्हापूरकरांनी रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. कोल्हापूरकरांचा रोष पाहता वनताराने महाराणी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरकरांच्या रोषानंतर वनताराकडून कोल्हापूरच्या नागरिकांची माफी देखील मागण्यात आली होती. विशेष म्हणजे कोल्हापूरकरांची माफी मागितल्यानंतर वनतराची टीम आज पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली. वनताराची टीम, सीईओं यांची दुसऱ्यांदा कोल्हापुरात चर्चा झाली. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग इथे नांदणी मठाचे मठाधिपती, लोकप्रतिनिधी आणि वनताराच्या साईओंची चर्चा झाली. या बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव जैन बोर्डिंग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही बैठक संपल्यानंतर नांदणी मठाचे मठाधिपती आणि वनताराचे सीईओ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
SL/ML/SL