महादेव जानकर यांची उमेदवारी दाखल
परभणी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महादेव जानकर यांनी बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत यासह आमदार बाबा जानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे , आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
या जागेसाठी राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर,भाजप कडून राहुल लोणीकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांची नावे चर्चेत होती, यांची नाराजी आता नाही, नाराजी शब्द भाजपमध्ये नाही, सर्वजण एकजुटीने काम करून परभणीतील महादेव जानकर यांना विजयी करण्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावयाचे आहे.मागील 5 वर्षांपासून प्रत्येक बुथ निहाय कार्यकर्त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ML/KA/PGB 1 APR 2024