चिंचपोकळी येथे होणार म्हाडा भाडेकरू कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, दि 28
म्हाडाच्या सेस व पुनर्रचित इमारतीच्या पुनर्विकासाबाबत नागरिक व भाडेकरूंच्या समस्या सोडविण्यासाठी म्हाडा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता, शिवदर्शन इमारत तेले गल्ली,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे कॅबिनेट मंत्री, भाजपचे मुंबई अध्यक्ष
आमदार आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर
उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच आपल्या काही भाडेकरूंच्या समस्या असतील तर त्या लिखित स्वरूपात घेऊन यावे असे आवाहन
भाजपा नेते रोहिदास लोखंडे यांनी केले आहे.