सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या महाड तालुकाध्यक्ष पदी फैज हुर्जुक
महाड, दि ९
महाड व पोलादपूर तालुक्यातील अपंग बांधवांच्या न्याय हक्का साठी शासन दरबारी लढणारे सामाजिक कार्यकर्ते फैज उमर हुर्जुक यांची सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या महाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सकल मुस्लिम युवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अझरूद्दीन भाई सय्यद यांच्या मान्यतेने फैज हुर्जुक यांची महाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फैज हुर्जुक यांची सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात असणारी ओळख व प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव याची दखल घेत त्यांची सकल मुस्लिम युवक संघटनेच्या महाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल समाजाकडून अभिनंदन होत आहे.JS/ML/MS